दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल तर फडणवीस हे सुधा पोलिसांच्या रडारवर
अधिवेशन काळातच विरोधी पक्षनेते अडचणीत
मुंबई/ विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच दोन वेग वेगळ्या प्रकरणात दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांवर गुन्हे दखल होणार आहेत त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते फडणवीस अडचणीत आले आहेत
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन केल्या प्रकरणी तक्रार नोंदवली असून या प्रकरणात .फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे तर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आम् आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून मुंबईच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेच्या निवडणुकीत मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दखल केला होता मात्र सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी त्यांना अपात्र ठरवले होते या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला तसेच सहकार विभागाने पोलिसांना कागदपत्र देऊनही गुन्हा दाखल केला जात नव्हता अखेर आम् आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे