ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान


मुंबई- जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी सध्या राज्यातील शासकीय, निम-शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये शालेय शिक्षकांचाही समावेश आहे. शाळेतील शिक्षक संपावर गेल्याने शाळांमध्ये शुकशुकाट असून काही ठिकाणी शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. शिक्षकांकडून दहावी आणि बारावी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, इतर वर्ग संपामुळे बंद आहेत. दोन वर्ष शाळा – महाविद्यालय बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी शाळा – कॉलेज सुरु झाल्यानंतर ऐन वार्षिक परीक्षा तोंडावर असताना शिक्षक संपावर गेलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य देखील टांगणीला लागले आहे.
जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संपावर गेले आहेत. त्यामुळे शाळांना कुलूप लवण्याची वेळ आली आहे. शिक्षक संपावर गेल्याने बारामती तालुक्यातील २७८शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्याचे शाळा बंद आहेत. कोरोनामुळे शिक्षणात विद्यार्थी मागे पडले आहेत. त्यात शिक्षक अधिवेशनामुळे बारामतीमधील बहुतांश शाळा बंद होत्या. आता पुन्हा जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक संपावर गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान होत आहे.
जिल्ह्यातील७३५ माध्यमिक शाळा संपामुळे बंद आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाचे ९ हजार कर्मचारी संपात सहभागी आहेत. तर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या ३५६९ शाळा सध्या बंद आहेत. प्राथमिक विभागाचे ११ हजार कर्मचारी संपात सहभागी आहेत. त्यामुळे शाळा बंद आहेत. त्यातच परीक्षेचा काळ असताना विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १३८६ शाळा असून त्यात ३४६६ शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारल्याने जिल्ह्यातील बहुतांश शाळा शिक्षक नसल्याने बंद ठेवाव्या लागल्या आहेत. सिंधुदुर्गात३२४३शिक्षक संपात सहभागी असल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे१३०७ शाळा बंद आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर आहेत.

error: Content is protected !!