ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अखेर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले – एप्रिल, मे, जुन मध्ये निवडणूक


नवी दिल्ली/ देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले ५४३ जागांसाठी एप्रिल ते मे मधे निवडणुका होणार असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यात निवडणूक होणार आहे
* देशात लोकसभेच्या ५४३ जागांच्या निवडणुकीसाठी  १९ एप्रिल,२६ एप्रिल , ७ मे,१३ मे , २० मे, २५ मे व १ जून या ७ टप्यात मतदान होणार तर महाराष्ट्रात ४८ मतदासंघात ७, मे, १३ मे , २० मे , २५ मे , १ जून या दिवशी ५ टप्प्यात मतदान होणार, संपूर्ण देशातील सर्व जागांवरचा निकाल ४ जूनला जाहीर होणार -: केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची घोषणा,
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक -2024 साठी आदर्श आचारसंहिता लागू*
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल –  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

error: Content is protected !!