ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

मुंबई महापालिकेत 1600 कोटींचा जाहिरात घोटाळा


मुंबई/ सोन्याची कोंबडी अशी ओळख असलेली मुंबई महापालिका म्हणजे सत्ताधारी,कंत्राटदार आणि पालिका प्रशासन या तिघां साठी भ्रष्टाचाराचे हिरवेगार कुरण आहे आणि याच कुरणावर चारून काहीजण इतके मजले आहेत की ते आता कायद्याला सुधा जुमानयला तयार नाहीत असे आम्ही नाही तर संपूर्ण मुंबईकर जनता म्हणतेय आणि आता तर पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी एक भयंकर आरोप केला आहे . – बस स्टॉपवर लावल्या जाणाऱ्या जाहिरातीत 1600 कोटींचा घोटाळा झालाय असा आरोप काँग्रेसच्या रवी राजा यांनी केल्याने राज्याच्या सतेत एकत्र असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेत बिघडू निर्माण झाली आहे
मुंबईतील एका वृत वाहिनीने दिलेल्या वृता नुसार बेस्टच्या थांब्यांवर लावल्या जाणाऱ्या जाहिरातींसाठी एका कंपनीचे 2446 कोटींची निविदा होती पण पालिकेने ती बाजूला सारून दुसऱ्या कंपनीची 871 कोटींची निविदा मंजूर केली यात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय रवी राणा यांनी व्यक्त करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे त्यामुळे एन महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेत वितुष्ट येण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!