ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पतीने केलेल्या भ्रष्ट कमाईला पत्नीचा पाठिंबा – गुन्हा दाखल


सिल्लोड- शासकीय पगाराव्यतिरिक्त पतीने नियमबाह्य कामे करून जर संपत्ती कमविली असेल तर त्याची चौकशी झाल्यानंतर पत्नी जर दोषी आढळली तर तिच्यावरही गुन्हा दाखल करण्याची व्यवस्था कायद्यामध्ये आहे .असाच एक गुन्हा सिल्लोड येथे वर्ग 2 चे सहाय्यक दुय्यम निबंधक छगन उत्तमराव पाटील यांची पत्नी वंदना छगन पाटील यांच्या विरोधात दाखल झाला आहे.
छगन उत्तमराव पाटील यांना दिनांक 2 मार्च 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्यांनी सेवा कालामध्ये कमवलेल्या सर्वच संपत्तीची उघडपणे चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले होते. या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास छत्रपती संभाजीनगरचे  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे हे करत होते. या तपासादरम्यान छगन उत्तमराव पाटील यांनी बेकायदेशीर आणि भ्रष्ट मार्गाने एक कोटी 80 लाख रुपयांची मालमत्ता कमावल्याचे उघडकीस आले आहे. नियमानुसार जी मालमत्ता मागे पडते ती वजा करून  ही मालमत्ता आहे. भ्रष्ट मार्गाने कमवण्यासाठी छगन पाटील यांची पत्नी वंदना पाटील हिनेदेखील मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .त्यामुळे सौ. वंदना पाटील यांच्या विरोधात देखील सिल्लोड पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सह भादवी कलम 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती संगीता पाटील या करीत आहेत.

error: Content is protected !!