ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मराठी, हिंदू माणूस दुखावला गेलाय- वचपा काढल्याशिवाय राहणार नाही

भाजपा गटनेते दरेकरांचा ठाकरेंना इशारा

मुंबई- उद्धव ठाकरे मुसलमानांपासून किंवा मुस्लिम धर्मियांपासून मागे हटायला तयार नाहीत. कारण त्यांना जे एकगठ्ठा मतदान झालेय त्याने ते खुशीत आहेत. ठाकरेंनी हेही लक्षात घेतले पाहिजे आपल्या अशा वागण्याने आणि जो विजय मिळालेला आहे त्यातून मराठी, हिंदू माणूस दुखावला गेलाय तोही तुमचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यावर दरेकर म्हणाले की, अशा प्रकारचा दावा कुणीही जाहीरपणे प्रसारमाध्यमातून करू नये. जेणेकरून महायुतीत विसंवाद, वितुष्ट निर्माण होईल. पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व बसून कुणाला किती जागा हा विषय सोडवतील. अन्यथा महाविकास आघाडीसारखेच मोठा भाऊ, छोटा भाऊ करत आपल्यात वादविवाद होतील हे कृपया सर्वांनी टाळावे आणि प्रवक्ते, प्रमुख नेत्यांनी याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेवर बोलताना दरेकर म्हणाले की, तिघे एकत्र आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करताहेत. तथापी महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जाणीवपूर्वक पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. दुसऱ्या बाजूला त्यांनी स्वबळाचा नारा दिलाय. तिसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार जरी ते एकत्र असल्याचे दाखवत असले तरी त्यांच्यात मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा जाणवत आहे.

दरेकर पुढे म्हणाले, आम्हाला कमी प्रमाणात यश मिळाले ही वस्तुस्थिती आहे. परंतु पॉईंट तीस टक्के वोट आम्हाला कमी आहेत. मग असे म्हणायचे का मुंबईतल्या जनतेने तुमचा पराभव केलाय. आम्हाला त्यांच्यापेक्षा दोन लाख मते जास्त आहेत. जे अपयश आम्हाला मिळालेय ते स्वीकारलेय. ते स्वीकारून चुका दुरुस्त करून आम्ही सामोरे जातोय आणि विधानसभेत प्रचंड यश महायुतीला मिळालेले दिसून येईल.

शरद पवारांनी देशात, महाराष्ट्रात

जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या

शरद पवार यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, शरद पवार यांनी राजकारण कशा प्रकारे केले हे महाराष्ट्र पाहतोय. शरद पवारांनी देशात, महाराष्ट्रात जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या, सत्तेत असताना सुडाचे राजकारण केले. त्यांना सल्ला देण्याचा नैतिक अधिकार नाही.

error: Content is protected !!