ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला

मुंबई/ शिंदे सरकार सतेवर आले तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.त्यामुळे या विस्तरकडे डोळे लाऊन बसलेले आणि मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची आणि त्यांच्या समर्थकांनी सध्या मुंबई मध्ये भाऊगर्दी वाढली आहे.दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होण्याची शक्यता आहे
नव्या मंत्रिमंडळात संख्या भाजपचे सर्वाधिक म्हणजे जवळपास 27 मंत्री असतील तर शिंदे गटाला 12 ते 15 मंत्रिपदे दिली जातील तसेच गृह,अर्थ,ग्राम विकास महसूल कृषी यासारखी प्रमुख खती अर्थातच भाजपकडे असतील तर शिंदे गटाला नगरविकास,परिवहन,शिक्षण,कामगार यासारखी खाती दिली जातील थोडक्यात या मंत्रिमंडळा वर भाजपचे वर्चस्व असेल.शिंदे हे भाजपच्या कृपेने मुख्यमंत्री झालेले असल्याने त्याना भाजपच्या पुढे जाता येणार नाही आणि हीच खरी त्यांच्या बंडाची शोकांतिका आहे.तर दुसरीकडे शिवसेना वाचवण्यासाठी उद्वव ठाकरे प्रयत्न करीत आहेत


मनसेला मंत्रिपदाची लॉटरी
काल उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे .

error: Content is protected !!