पत्रकारांचा फोन पोलीस जप्त करू शकत नाहीत- न्यायालयाचा निर्णय
त्रिवेंद्रम/पत्रकारांचा फोन कोणी जप्त करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केरळ मधील एका आग्रहण्य दैनिकांच्या पत्रकारांचा फोन पोलिसांनी जप्त केला होता तो त्यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत
केरळमधील एका अग्रगण्य दैनिकाचे पत्रकार के.विषकन यांचे एका गुन्हेगाराशी मोबाईल वरून संभाषण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती तसेच त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या मोबाईल जप्त केला होता याप्रकरणी त्यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला न्यायालयाने म्हटले आहे की संबंधित पत्रकाराला सीआरपीसी अंतर्गत कलम 41 ची नोटीस न देता त्याच्यावर परस्पर कारवाई करणे चुकीचे आहे. सदर पत्रकार हा राजकीय बातम्या कव्हर करणारा राजकीय बातम्या कव्हर करणारा रिपोर्टर आहे. यावेळी न्यायालयात त्याच्या वकिलाने सांगितले की कामाच्या निमित्ताने कधीकधी पत्रकारांना गुन्हेगारांशी बोलावे लागते याचा अर्थ त्यांचा गुन्हेगाराशी संबंध आहे असा होत नाही आणि हीच बाब न्यायालयाने ग्राह्य धरून पोलिसांवर खडक ताशेरे ओढले.