ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका आणि सरकार झोपले आहेत का?

धक्कादायक! मुंबईत सरकार जमिनीवर २०० अनधिकृत इमारती
मुंबई/सध्या मुंबईची धर्मशाळा झाली आहे देशाच्या वेगवेगळ्या काना कोपऱ्यातून कुणीही येतो आणि आणि मिळेल तिथे चार बांबू ठोकून निवारा उभा करतो सुरवातीला ताडपत्र्या आणि प्लास्टिक च्या कागदानी केलेल्या या अनधिकृत बांधकामांवर पुढे पत्रे आणि कौले चढतात पालिका त्यांच्यासाठी रस्ते शौचालये नळपाणी आणि दिवा बत्तीची सोय करते त्यामुळे एकाच्या दोन आणि दोन हजार या पट्टीत झोपडपट्ट्या बनतात.त्यानंतर झोपडपट्टी वासी रेशन कार्ड पासून आधार कार्ड पर्यंत सर्व निवासाचे पुरावे गोळा करतात. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत त्यांचा समावेश होऊन पुढे त्यांना इमारती मध्ये पक्के घर मिळते तर भूमाफिया सरकारी आणि आरक्षित भूखंडावर कब्जा करून तिथे अवैध इमारती बांधून कोट्यवधी रुपये कमावतात .मुंबईत अशा २०० अवैध इमारती उभ्या असल्याची धक्कादायक माहिती एका माहितीच्या अधिकारात मिळाली आहे .त्यामुळे या सर्व अवैध इमारतींचा सर्व्हे करून त्या कुठल्या पालिका अधिकाऱ्याच्या काळात उभ्या राहिल्यात त्याची नगर विकास खात्याने चौकशी करून त्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर जनतेने केली आहे.

error: Content is protected !!