अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ
विमानाला लटकले तरी मृत्यने गाठले
कबूल/ अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या गदारीमुळे अखेर काल तालिबान्यांचा विजय झाला .राष्ट्रपतींना परदेशी पळ काढावा लागला तर अफगाणी जनता आणि विदेशी नागरिक यांना जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळावे लागले.मुंबईच्या लोकल ट्रेन सारखी विमानाला गर्दी झाली काहींनी विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला पण विमानाचे उड्डाण होताच विमानाला लटकलेल्या तिघांचा खाली पडून मृत्यू झाला.दरम्यान तालिबानने युद्ध बंदीची घोषणा केली असून सर्व नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे
तालिबान आणि अफगाण सैन्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू होते.मात्र अफगाण सैन्यातील काही अधिकाऱ्यांचा तालिबानला पाठींबा असल्याने अफगाणिस्तानातील एक एक शहर तालिबान्यांनी काबीज केले.याच दरम्यान अफगाणिस्तानातील महत्वाचे कंदार शहर तालिबान्यांचा ताब्यात गेल्याने राष्ट्रपती गणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी अफगाण सोडताच लष्कराने काल तालिबानी सैन्यासामोर शरणागती पत्करून राजधानी काबूल तालिबान्यांचा हवाली केली त्यानंतर तालिबानने युद्ध बंदीची घोषणा केली आणि नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले मात्र घाबरलेल्या नागरिकांची पळा पळा सुरू झाली आणि प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी काबूल विमानतळाच्या दिशेने पळू लागला यावेळी तेथे थांबलेल्या एका विमानात शेकडो लोक घुसले तर काही विमानाला लटकले मात्र विमानाचे उड्डाण होताच तिघांचा खाली पडून मृत्यू झाला याच दरम्यान काबूल विमानतळावर गोळीबार होऊन त्यात पाच जणांचा मृत्यू झाला तर वेगवेगळ्या देशाने अफगाणिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांना तेथून परत आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत दरम्यान अमेरिकेने आपल्या नागरिकांना आणण्यासाठी कमांडो असलेले विमान पाठवले होते आणि काही काळ या कमांडोंनी काबूल विमानतळाचा ताबा घेऊन आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले मात्र इतर देशाचे नागरिक अजूनही अडकून पडले आहेत त्यात राजदूत आणि विविध देशातील दूतावासातील नागरिकांचाही समावेश आहे.
बॉक्स/ भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची तालिबानची हमी
भारता बरोबर आम्हाला चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत त्यामुळे इथल्या भारतीय नागरिकांना त्रास होईल असे आम्ही काहीही करणार नाही त्यांच्या सुरक्षेची आम्ही हमी देतो असे तालिबानने म्हटले आहे त्यामुळे मोदी सरकारने सुटकेचा निःश्वास टाकला आहे काबूल विमानतळावर १३० भारतीय अडकले असून त्यांना परत आणण्या साठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे तर २८० शीख बांधव काबूल मधील एका धार्मिक स्थळी आसरा घेतला असल्याचे समजते