ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

भाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट चा स्वातंत्र्य दिन वसतिगृहात साजरा


स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी निमित्त भाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट स्वातंत्रदिन आणि ध्वजारोहण सोहळा अनोख्या पद्धतीने बहुजन हिताय विध्यार्थी वसतिगृह उल्हासनगर येथे साजरा करण्यात आला । भाई शिंगरे ट्रस्ट तर्फे धनधान्य स्वरूपात किमान महिनाभर ची रसद मदत म्हणून देण्यात आली
सदर कार्यमाची सुरुवात डॉ पदमभूषण प्रकाश मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली। या प्रसंगी विशेष आथिती म्हणून भाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट चे संस्थापक मा चंदन भाई शिंगरे उपस्थित होते । ट्रस्ट च्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा श्रीमती सुवर्णा ताई इसवलकर ।महाराष्ट अध्यक्ष श्री सचिन जी पाताडे ।मुक्त पत्रकार आणि ।मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे सद्यस्य श्री प्रशांत भाटकर ट्रस्ट च्या वडाळा विभाग प्रमुख श्रीमती नयनाताई राणे उपस्थित होते।
कार्यक्रमाचे अध्यक्षपद आ धम्मचारी अक्षयमतीजी यांनी भूषवले ।सदर कार्यक्रमात वसती गृहाचे अधीक्षक मा अश्व्हजित मैत्र यांनी वसतिगृहाचे संपूर्ण कार्य व त्याचे नियोजन कसे केले जाते याची सर्वांना पूर्ण माहिती दिली। कोविडमुळे अजून ही 2 वर्षाचा शासकीय अनुदान रखडला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली। बहुजन हिताय विद्यार्थी संस्थेच्या अजून महाराष्ट्रात 16 वसतिगृहे आहेत।
आदिवासी पाड्यातील ।लहान गावातील शिक्षणापासून वंचित असलेली 45 मुले या वसती गृहात शिक्षणाचा लाभ घेत आहेत। वसती गृहात शालेय शिक्षणासोबत ।व्यक्तिमत्व विकास आणि संगणक शिक्षण सुद्धा दिले जाते ।
कार्यक्रमात वसतिगृहातील मुलांनी मनोरंजनसाठी काही देशभक्ती पर गीते नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली । शेवटी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। असा अनोखी पद्धतीने देशाचा स्वातंत्रदिन भाई शिंगरे ट्रस्ट तर्फे साजरा करन्यात आला। भाई शिंगरे ट्रस्ट चे गणेश गोसावी देसाई दीप बदले आचोलकर ।मेमाणे इत्यादी पदाधिकारीनि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली

error: Content is protected !!