आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/ भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारचे पाहिले पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात इतर प्रश्नानं बरोबरच सत्ताधारी पक्षाच्या आमदार कडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि मंत्र्यांकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेली मारहाण हे मुद्दे गाजणार आहेत कारण अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधी पक्ष नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ता आली म्हणून मस्ती आली का असा सवाल अजित दादांनी केला त्यामुळे या अधिवेशनात विरोधक आक्रमक असतील हे स्पष्ट झाले आहे
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि हे सरकार कशा चुकीच्या पद्धतीने सतेवर आले आहे ते सांगितले तसेच शिंदे गटाच्या आमदारांच्या अरेरावी चा समाचार घेतला मंत्री संतोष बंगर यांनी सरकारी कर्मचाऱ्याला केलेली मारहाण आणि मगाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कुणी अरे केले तर करे करून त्याला ‘ठोकुन कढा अशी चिथावणी दिली होती या दोन्ही घटनांचा समाचार घेताना अजितदादांनी सता आली म्हणून मस्ती आली कारे असा सवाल सरकारला केला तर सरकारने घेतलेल्या पत्रकार परिषदेत कमी वेळात आम्ही किती चांगले निर्णय घेतले ते सांगितले