पुण्यात स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा
पुणेः परवा पुण्यात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची धक्कादायक घडली घडली होती. आता पुन्हा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादचे नारे लाव
‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार पुण्यातील कोंढवा भागात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोघांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले. दोन्ही आरोपी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना अटक केली आहे’
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोंढवा भागात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोघांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले. दोन्ही आरोपी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना अटक केली आहे
दरम्यान, पुण्यात एका म्युझिकल कॉन्सर्टमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान करणारी घटना समोर आली होती. गायिकेनं तिरंगा झेंडा प्रेक्षकांमध्ये भिरकावल्यानं हा अवमान घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी संबंधित गायिकेवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली होती.