ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचे मुंबईत तर फडणवीसांचे नागपूरमध्ये ध्वजारोहण – महाराष्ट्रासह देशात ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मुंबई: आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. तर राज्यातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तर नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहण झालं.
लिबागच्या पोलीस मैदानावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री तथा मृदू आणि जलसंधारण मंत्री संजय
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. या ध्वजारोहण सोहळ्याला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरही उपस्थित होते. जोवर आकाशात चंद्रसूर्य आहेत, तोवर भारताचा राष्ट्रध्वज डौलानं फडकत राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं सांगून देवेंद्र फडणवीसांनी नागपूरसह राज्यातल्या जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. घर घर तिरंगा या मोहिमेत गरिबातल्या गरीब नागरिकांनीही सहभाग घेतला आणि ‘माझी माती माझा अभिमान’ मोहिमेतही ते सहभाग घेत आहेत, याबद्दल फडणवीसांनी आनंद व्यक्त केला. शेतकऱ्यांना राज्य सरकार सातत्यानं मदत करत असल्याचं सांगून त्यांनी पीक विमा, कर्जमाफी, कर्ज पुनर्गठन या शासकीय योजनांचा उल्लेख केला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात ध्वजारोहण केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूर भेटीत मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. शिवाय काळम्मावाडी धरणाचं काम आणि आयुक्त देण्याबाबतही अजित पवार यांनी आश्वासन दिलं.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर 77 वा स्वातंत्र्यदिन उत्सहात संपन्न झाला. मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
अमरावतीत आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा बँकेत शहीदवीर पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण केलं. शहीद वीर पत्नी सरस्वती मासोदकर यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. यावेळी बँकेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानींच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला
बीडमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आल असून या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची देखील उपस्थिती होती. ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सत्कार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नैसर्गिक संकटामध्ये मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा असून राज्यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार कटीबद्द असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. प्रत्येक शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रशासन प्रयत्नशील आहे अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली
भारतीय स्वातंत्र्यदिन रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. या निमित्ताने अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती संस्था यांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. भयमुक्त व भूकमुक्त देशासाठी नागरिकांनी कर्तव्य भावनेने पुढे येण्याचे आवाहन पालकमंत्री मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले. हा दिवस संकल्पाचा असून शहिदांचे स्मरण करत विकासाचा मार्ग चोखाळण्याचा प्रेरक दिवस असल्याचे ते म्हणाले
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आलेख मांडला. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. शेतकरी, मागासवर्गीय व दुर्बल घटकातील व्यक्तींच्या उन्नतीसाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात असून, यामाध्यमातून लातूर जिल्ह्याच्या विकासाचा वारसा कायम सुरु राहील, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी दिली

error: Content is protected !!