राडेबाजी नंतर सारथी बार बंद करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी- सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील गावकर यांची धाडसी करवाई
मुंबई – केवळ सरकारला पैसे आणि पोलिसांना हफ्ते मिळतात म्हणून आजकाल नागरी वस्त्यांमध्येही अनैतिक धंदे सुरू झाले आहेत. मात्र अशा धंदया त्या भागातील मुलांच्या मनावर किंवा कामधंद्या निमित घराबाहेर पडणार्या सुसंस्कृत महिलांना किती त्रास सहन करावा लागतो याचा तरी इथल्या लोकप्रतिनिधी ,पोलिस आणि सरकारने विचार करायला हवा . लॉकडाउन मध्ये बार बंद असताना सर्वकाही शांत होत पण आता सरकारने निर्बंध काही प्रमाणात हटवल्याने बार सुरू झालेत . तिथे प्याला जाणार्या ग्राहकांची वर्दळ आणि पिवून बाहेर आल्यावरचे तमाशेही वाढले आहेत .दादर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सारथी बार सुरू झाला आणि या भागातील जनतेचा मनस्ताप सुधा वाढून बारमधून बाहेर पाडणाया दारुड्यांच्या हाणामान्या,अचकट विचकट घाणेरड्या भाषेत बोलणे आणि महिलांकडे पाहून अश्लील भाषेत शेरेबाजी हे सर्व सुरू. मात्र १४ सप्टेबरला तर कहरच झाला बारमध्ये दारू प्याला बसलेले काही ग्राहक आणि बारमधले वेटर यांच्यात बाचाबाची झाली वाद वाढतच हाणामारी सुरू झाली .ही हाणामारी बारच्या फुटपाथवर आली आणि मोठा राडा झाला .या राडया मुळे रहिवाशी घाबरलेले असून अशा घटना येथे अधून मधून घडत असल्याने हा बार तत्काळ बंद करावा अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे रहिवाशी करणार असल्याचे समजते . मात्र बार मालकाच्या दहशतीमुळे आजवर रहिवाशांनी सगळ सहन केल पण या अशा घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने यापुढे हा बार इथे नको या बारमुळेच इथल्या काही तरुण मुलांना दारूचे व्यसन लागले आहे असेही काही रहिवाशांचे म्हणणे आहे .
: सहाय्यक आयुक्त गावकर यांची धाडसी करवाई
सारथी बार हा मुंबईतील एका बड्या असामीचा असल्याचे संगितले जाते .त्यामुळे १४ सपटेबरचे प्रकरण दाबण्याचा काही लोकांचा प्रयत्न होता .तसेच या बाबतची माहिती प्रसार माध्ममाना हाती पूर्ण लागत नव्हती .पण दादरचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील गावकर यांच्या सारखे धाडसी आणि समाजाशी नाळ जोडलेले प्रामाणिक अधिकारीही पोलिस दलात आहेत ते धावले .त्यांनी सारथी बार मध्ये राडा करणार्या 7 जणावर एफ. आय. आर. दाखल केला आणि पोलिस अशा घटनांना कधीच पाठीशी घालणार नाही असे संगितले . तसेच कारवाईची माहितीही प्रसार माध्यमांना दिली .त्यांच्या या धाडसा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.