ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

वसंतदादा पाटील प्रतिष्ठान – एक आदर्श शैक्षणिक संस्था


मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान चां वतीने चालवण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थेतून बारावी नंतर च्या पुढील वेगवेगळ्या विषयांवरील शिक्षणाबाबत जे अभ्यासक्रम घेतले जातात ते विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात स्वतःच्या पायावर उभे करणारे आहेत तसेच विध्यार्यांच्या जीवनाला दिशा देणारे आहेत असे या शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी ॲड.अप्पासाहेब देसाई यांनी सांगितले . महाविद्यालय शिक्षणातून बी ए,बी कॉम किंवा बी एस सी चां पदव्या घेऊन त्यांचा नोकरी मिळवण्यासाठी आजकाल फारसा उपयोग होत नाही .म्हणूनच दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांचा कल तंत्र शिक्षणाकडे असतो आणि मुलांची हीच गरज ओळखून वसंतदादा पाटील प्रतिष्ठानने विविध तांत्रिक शिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत त्यात संगणकीय तंत्र शिक्षण पासून इतर अभियांत्रिकी तसेच मार्केटिंग आणि जे .जे . स्कूल ऑफ आर्टच्या धर्तीवर व्यावसायिक आर्टच्या अभ्यास क्रमाची सुधा व्यवस्था आहे . अशा शिक्षणासाठी पैशाची आवश्यकता असते त्यामुळे गरीब मुलांना हे शिक्षण घेणे परवडत नाही म्हणूनच संस्थेने शैक्षणिक कर्जाची तसेच लागणारा खर्च ई एम आय द्वारे विद्यार्थ्यांना देता येईल अशीही व्यवस्था केली आहे . विद्यार्थ्यांचा वास्तव्यासाठी कांदिवली आणि वडाळा येथे छात्राल्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे . मुंबई जनसत्ता दिलेला मुलाखतीत संस्थेचे जनरल सेक्रेटरी अप्पासाहेब देसाई व अध्यक्ष नंदकुमार काटकर यांनी ही माहिती दिली .

error: Content is protected !!