क्रूरकर्मा आफताबला फासावर लटकवा- महिलांची मागणी
दिल्ली/ आपल्या प्रेयसीला ठार मारून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते जंगलात टाकणाऱ्या क्रूरकर्मा आफताब याला फासावर लटकवा अशी मागणी देशातील महिला संघटनांनी केली आहे .
सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून वसई येथील श्रद्धा वळकर ही तरुणी आफताब पूनावला याच्या प्रेमात पडली आणि घरच्या लोकांचा विरोध डावलून त्याच्या सोबत दिल्लीला पाळून गेली . त्याच्या सोबत लिव्ह एन रिलेशन मध्ये राहू लागली पण तिने लग्नाचा तगादा लावताच अफताबने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि 3 आठवडे फ्रीजमध्ये ठेवले त्यानंतर त्यातील एक एक तुकडा घेऊन तो मेहरोली जंगलात टाकला मात्र ही घटना घडून 6 महिन्यांनी याचा उलगडा झाला आणि पोलिसांनी आफताब याला अटक केली आता चौकशीत तो त्याच्या पापाची कबुली देत आहे . मुस्लिम तरुणांच्या सोबत प्रेम करणाऱ्या इतर धर्मातील तरुणींनी या घटनेतून धडा घेणे गरजेचे आहे .