आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
ठाणे/ भाजपतील महिलेने केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे
कळवा येथील मुख्यमंत्र्यांच्या एक कार्यक्रमात गर्दीतून वाट काढताना जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला ढकलले होते त्यामुळे त्यांच्यावर कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता .त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते . दरम्यान या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता असल्याने आव्हाड यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यावर मंगळवारी सुनावणी झाली यावेळी आव्हाड यांच्या वकिलांनी त्या घटनेवेळीचा व्हिडिओ न्यायमूर्ती याना दाखवून आव्हाड यांनी त्या महिलेचा कोणत्याही प्रकारे विनयभंग केला नाही असे सांगितले . त्यानंतर न्यायालयाने आव्हाड यांचा जामीन अर्ज मंजूर केला आणि व त्यांचा जामीन मंजूर केला .