नाविकांना हवी आयकरात सूट ; मागण्यांचे निवेदन राज्यपालांना सादर ; केंद्र सरकार कडे भावना कळविण्याचे राज्यपालांचे आश्वासन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय खलाशांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण आयकरात सूट मिळावी व नाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्राधान्याने कोटा मिळावा, या महत्त्वाच्या मागण्यांसाठी नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेचे सरचिटणीस व सह खजिनदार श्री. अब्दुल गणी सेरंग, उपाध्यक्ष मिलिंद कांदळगावकर व नुसीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी प्रकाश ठाकूर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सर्व खलाशी कामगारांच्या वतींने मागण्यांचे निवेदन सादर केले. नुसीच्या कुशल व कामगार कल्याणकारी योजना आणि नुसीची १२५ वर्ष साजरी होणारी वैभवशाली कार्यपरंपरा राज्यपालांना आवडल्यामुळे त्यांनी दोन्ही मागण्या भारत सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यापुढे होणारी प्रगती नाविकांना कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.