PM मोदी काशीहून निवडणूक लढले आणि काशी विश्वेश्वर मंदिराचा कायापालट केला
मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मोदी काशीहुन निवडणूक लढले आणि काशी विश्वनाथ मंदिराचा कायाकल्प केला. केदारनाथ, बद्रीनाथ, अयोध्या, सोमनाथ, इ. मंदिरासह मंदिर परिसर सुशोभीकरण चालू आहे.
आमचे पवार साहेब 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आषाढी पूजेला पंढरपूरला गेले असणार. पंढरपूरला लागूनच असलेल्या माढा येथून लोकसभेत गेले. पण कधी अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपूर मंदिर परिसर, भक्तांसाठी सोयी-सुविधा, वारकऱ्यांसाठी येण्या-जाण्यासाठी सोय, इ. असं काहीच केलं नाही. वारकऱ्यांसाठी वारकरी पथ मोदींचे मंत्री नितीन गडकरी बांधत आहेत.आणि त्यांचे खासदार म्हणतात, 26 खासदार असलेल्या गुजरातचा पंतप्रधान होऊ शकतो, तर 48 खासदारांच्या महाराष्ट्राचे पवार साहेब का नाहीत होणार…