ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

धक्कादायक! पालिका शाळेतील १३हजार मुलांना मधुमेह रक्तदाब

मुंबई/ मधुमेह आणि रक्तदाब हे विकार मोठ्या माणसांमध्ये असतात असे आजवर समजले जायचे पण आता शाळकरी मुलेही या व्याधीच्या चक्रव्यूहात अडकली आहेत .महापालिकेने गेल्या सप्टेंबमध्ये शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी केली होती त्याचा अहवाल आला आहे त्यानुसार पालिका शाळेतील २,८२००० मुलांची रक्तदाब चाचणी केली असता तब्बल ८००० मुलांना रक्तदाब असल्याचे आढळले तर २,७१००० मुलांची मधुमेह चाचणी केली असता त्यात ५ हजाराहून अधिक मुलांना मधुमेह असल्याचे समजले त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग हादरून गेला असून पालकांना मुलांच्या आरोग्याची नीट काळजी घ्या त्यांना सकस आहार व्यायाम करायला लावा असे पालकांना सांगण्यात आले आहे .

error: Content is protected !!