मुश्रीफ यांच्यावरून सोमय्यांचा पवारांना टोला
मुंबई – मी मुसलीम असल्यामुळेच माझ्यावर छापे टाकले जात आहेत या हसन मुश्रीफ यांच्या विधानावर किरीट सोमय्या यांनी पवारांवर निशाणा साधला आहे . ते म्हणाले कि मुश्रीफ यांचे हे विधान मान्य असल्याचे पवारांनी सांगावे भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का असा सवालही सोमय्या यांनी केला आहे
भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर पहिल्यांदाच किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर असल्यानं या दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. सोमय्या यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत पुन्ह एकदा हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. मी मुस्लिम असल्यानं हे छापे मारले जात आहेत, जाणीवपूर्वक छापे मारले जात आहेत असा आरोप ईडीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफ यांनी केला होता. आता यावरून किरीट सोमय्या यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधाला आहे. शरद पवार यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी हसन मुश्रीफ यांचे जातीयवादी विधान मान्य असल्याचं सांगावं असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मी मुस्लिम असल्यानं हे छापे मारले जात आहेत, जाणीवपूर्वक छापे मारले जात आहेत, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. मुश्रीफ यांच्या या वक्तव्यावरून सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला. भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का?, मला कोल्हापूरमध्ये प्रवेश करू दिला नाही, तेव्हा धर्म आठवला नाही का? असे सवाल करत सोमय्या यांनी मुश्रीफ यांना टोला लगावला आहे. तसंच शरद पवार यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी हसन मुश्रीफ यांचे जातीयवादी विधान मान्य असल्याचं सांगावं असंही सोमय्या यांनी यावेळी म्हटलं आहे.