महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल आज काय होणार
ठाकरेच्या बाजूने निकाल लागल्यास सरकार कोसळणार
दिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील कायदेशीर सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज निकाल लागणार आहे . १६ आमदारांच्या अपात्रतेची मुद्दा ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार कि याच खंडपीठात पुढील सुनावणी होणार हे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कळेल मात्र जर याच खंडपीठाने निकाल दिला आणि निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून १६ आमदारांना अपात्र केले तर राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार कोसळू शकते
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात सलग तीन दिवस सुनावणी सुरु होती. यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून या प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का? याबाबतचा निकाल उद्या (शुक्रवारी) सुप्रीम कोर्ट निकाल सुनावणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात तीन दिवस चाललेला दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. आज सकाळी सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टात शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद झाला त्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रतिवाद झाला. दुपारी लंच ब्रेकची वेळ झाली असतानाही कोर्टानं जेवणाची वेळ पुढे ढकलून सुनावणी सुरू ठेवली अखेरीस जोरदार घमासान आणि दावे प्रतिदावे ऐकत अखेरीस सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? याचा निर्णय सुप्रीम कोर्ट उद्या घेणार आहे.