ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला- निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय

सत्ता संघर्षाची लढाई ७ न्यायमूर्तींकडे नेण्याची ठाकरे गटाची मागणी न्यायालयाने फेटाळली
त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला -एकनाथ शिंदे
दिल्ली – आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले त्यांची मुख्य याचिका लार्जर बेंचकडे सोपवण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली ता दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुःयबान चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.

2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण २०१८ मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत.

शिवसेना पक्षाने २०१८ मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवले आहे. पक्षांतर्गत निवडणूक निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला. दरम्यान या निकालाने खचू नका हिमतीने लढूया असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.

error: Content is protected !!