ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला नवीन दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत १८ ठार


प्रयागराज/कुंभमेळ्याला निघालेल्या भाविकांवर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात काळाने घाला घातला आणि प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी होऊन त्यात 18 भाविकांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक जखमी झाले आहेत उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर केली आहे तर जखमींना अडीच लाख तसेच या दुर्घटनेची चौकशी केली जाणार आहे
शनिवारी रात्री नऊच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या 14 नंबर प्लॅटफॉर्मवर प्रयागराज कडे जाणारी गाडी येणार होती त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली होती परंतु अनाउन्समेंट करणाऱ्यांनी ही गाडी सोळा नंबर प्लॅटफॉर्मवर येईल असे सांगितले त्यामुळे 14 नंबर प्लॅटफॉर्म वरचे प्रवासी 16 नंबर कडे जाण्यासाठी सरकता जीना जवळ गर्दी करून उभे होते प्रचंड त्या ठिकाणी गर्दी झाली होती आणि याच गर्दीत चेंगराचेंगरी होऊन 18 लोकांना आपला जीव गमवावा लागला यामध्ये दहा महिला चार मुले आणि चार पुरुषांचा समावेश आहे या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे सोडलेले आहेत परंतु त्यांचे वेळापत्रक व्यवस्थित नसल्याने कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गैरसोय आणि हाल होत आहेत या प्रकरणी भाविक उत्तर प्रदेश सरकारला दोष देत आहेत

error: Content is protected !!