ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होईल चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान


मुंबई/ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावी असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे लक्ष आता महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकायचे आहे त्या दृष्टीने भाजपाकडून मोर्चे बांधणी केली जात आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावी असे आवाहन केले होते महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे काही नेते जरी सांगत असले तरी काही नेते मात्र या निवडणुका महायुतीतील तिन्ही पक्षांनी स्वबळावर लढाव्या असे म्हणत आहेत मात्र याबाबतचा कोणताही निर्णय अजून झालेला नाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सुटेल आणि महापालिका निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा होईल अशी आशा नेत्यांना आहे महायुती आणि भाविकास आघाडी यांचे सर्व लक्ष मुंबई महानगरपालिकेवर आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोणत्याही परिस्थितीत महापालिका आतून जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे तर मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे

error: Content is protected !!