ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

मनसेनं फोडली IPLची बस –‘खळ्ळ- खट्याक

मुंबई : मनसेनं फोडली IPLची बस; गुन्हा दाखल, चार जण ताब्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.

आयपीएलमधील खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस फोडल्याची मंगळवारी रात्री घडली.

मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांनी मंगळवारी रात्री 11:50 च्या सुमारास ताज हॉटेलजवळ आयपीएलमधील संघासाठी आलेली बस फोडली. आयपीएल सामन्याच्या सरावासाठी आलेल्या संघातील खेळाडूंची हॉटेल ते स्टेडियम ने- आण करण्यासाठी बसची व्यवस्था असते. अनेकदा इशारा देउनही मुंबईतील मराठी वाहतूक व्यावसायिकांना हे काम देण्यात आलेलं नाही, असा आरोप मनसेने केलाय.

मराठी व्यावसायिकांऐवजी दिल्लीतील व्यावसायिकांना कामाचे कंत्राट दिले जाते, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केलाय. प्रशांत गांधी यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी मंगळवारी रात्री या बसच्या काचा आणि दिवे फोडले.

error: Content is protected !!