ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

फायर ऑडिट कडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या रुग्णालयावर कारवाई

मुंबई – गेल्या दोनतीन वर्षात रुग्णालयामध्ये आगीच्या घटना घडत आहेत आणि त्यात काही रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत म्हणूनच सरकारने प्रत्येक रुग्णालयाला फायर ऑडिट बंधनकारक केलेआहे.मुंबई महापालिकेच्या 1544 रुग्णालयांना सुधा फायर ऑडिट करून त्यातील सुरक्षे मध्ये असलेल्या त्रुटी सुधारण्यास सांगण्यात आल्या होत्या त्यापैकी 1324 रुग्णालयांनी आदेशाचे पालन केले पण अजूनही 24 रुग्णालय अशी आहेत की त्यांनी अग्निसुरक्षेतील त्रुटींमध्ये अजूनही आवश्यक ते बदल केलेले नाही त्यामुळे या रुग्णालय प्रशासनावर पालिका कारवाई करणार आहे

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये अनेक इमारतींमध्ये लागलेल्या आगीला तेथील अग्निशमन सुरक्षा असलेल्या त्रुटी जबाबदार असल्याचे मुंबई अग्निशमन विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात ताडदेव येथील कमला बिल्डींगमध्ये भीषण आगीची घटना घडली होती.तसेच अलीकडेच भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तर १० निष्पाप रुग्णांचा बळी गेला होता.तशीच घटना मुंबईतील भांडूप येथील सनराईज रुग्णालयात घडली होती.त्यातही ११ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता.त्यानंतर पालिका प्रशासनाने सावध होत अग्निशमन विभागाला यासंदर्भात कसून चौकशी आणि पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार १३२४ रुग्णालयांची तपासणी केली असता तब्बल ६६३ रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर पालिकेने या सर्व रुग्णालयांना १२० दिवसांत आपल्या त्रुटींची पूर्तता करण्यात यावी अशा आशयाची नोटीस बजावली होती.यातील ६३९ रुग्णालयांनी नोटिशीचे पालन केले.मात्र २४ रुग्णालयांनी पालिकेच्या नोटीसीकडे सपशेल कानाडोळा केल्यामुळे आता पालिकेने या रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.दरम्यान ,मुंबई शहर अग्निशमन दल प्रमुख हेमंत परब यांनी सांगितले की,या यासंदर्भातील कागदपत्रे पालिकेच्या विधी विभागाकडे पाठवली आहेत.आता न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल.

error: Content is protected !!