ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

छातीस गड मध्ये पोलिसांकडून २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

कांकेर – देशभरात येत्या १९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मतदानाच्या तीन दिवस आधीच छत्तीसगडच्या कांकर भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. माड परिसरात अजूनही गोळीबार सुरु आहे. जखमी जवानांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त फोर्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांकडून नक्षली कारवाई केल्या जातात. त्यामुळे गृह विभागाकडून संपूर्ण काळजी घेतली जाते. असं असताना छत्तीगडमध्ये नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही चकमक दुपारपासून सुरु होती. या चकमतीकत 29 नक्षलवाद्यांचा खात्मा पोलिसांनी केला आहे
या चकमकीत नक्षलवाद्यांचा कमांडर शंकर राव याचा खात्मा करण्यात आला आहे. त्याच्यावर २५ लाखांचं बक्षीस गृह विभागाने जाहीर केलं होतं. चकमकीदरम्यान आतापर्यंत नक्षलवाद्यांचे २९ मृतदेह आढळले आहेत. यासोबतच ऑटोमॅटीक रायफल्सही सापडल्या आहेत. पोलिसांनी हाती आलेल्या सर्व रायफल्स जप्त केल्या आहेत. तसेच या गोळीबारात 3 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि राज्य राखीव दल यांची एक संयुक्त टीम नक्षलविरोधी अभियानासाठी निघाली होती. या दरम्यान छोटे बेठिया पोलीस ठाणे क्षेत्रात जंगलात गोळीबार सुरु झाला. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.

error: Content is protected !!