ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

दोषी आढळले तर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर सुधा कारवाई करणार- वळसे पाटील

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांवर नाराज
मुंबई/ पुण्यातील राड्या नंतर भाजपच्या विरोधात मवाळ भूमिका घेणाऱ्या आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काहीही दोष नसताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत पक्ष कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा वळसे पाटील यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते यावेळी त्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते सुधा जमले आणि त्यातील काहींनी राष्ट्रवादी विरोधात घोषणा दिल्या दरम्यान महागाईच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे याना भाजपच्या कार्यकर्त्यांने थप्पड मारली. मात्र या प्रकरणी गृहमंत्री राष्ट्रवादीचा असूनही दिलीप वळसे पाटील यांनी भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली नाही .या प्रकरणी खूप उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला . आता गृहमंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुधा दोष देत आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगत आहेत .त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्री वळसे पाटील यांच्यावर चांगलेच चिडलेले आहेत .केतकी चितळे प्रकरणात सुधा गृहमंत्री वळसे पाटील यांनी अशीच कचखाऊ भूमिका घेतल्याचा काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचा हा रोष वळसे पाटील यांना महागात पडू शकतो

error: Content is protected !!