ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यानवी मुंबईमहापालिकामहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील पालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर

मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी पाऊस पडतो तर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अधिक पाऊस पडत असल्याने या भागातील निवडणुका पावसाळ्यानंतर होणार आहेत . मुंबई ही कोकण प्रातांशी जोडलेली असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक पावसाळा नंतर होणार आहे या दरम्यान प्रभाग पुनर्रचना आणि वार्ड निहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे .दुर्दैवाने ही निवडणूक ओबीसी आरक्षण शिवाय होणार असल्याने ओबीसींवर खुल्या प्रभातून निवडणूक लढवण्याची पाळी आली आहे.

error: Content is protected !!