ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी खेचून आणला !

.….कल्याण आणि डोंबिवली हे सुरुवातीला भारतीय जनसंघाचे बालेकिल्ले होते. भगवानराव जोशी हे कल्याण चे तर आबासाहेब पटवारी हे डोंबिवली चे नगराध्यक्ष होते. कल्याण येथे त्यापूर्वी कृष्णराव धुळुप हे शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रतिनिधी होते. ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते सुद्धा होते. ठाण्यात शिवसेनेचे वसंतराव मराठे आणि नंतर सतीश प्रधान हे नगराध्यक्ष होते. प्रधान यांचा शिवसेनेच्या पहिल्या नेत्यांमध्येही समावेश बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. सुरुवातीला इशान्य मुंबई मतदारसंघ थेट अंबरनाथ च्या आयुध निर्माणी म्हणजेच ऑर्डिनन्स फँक्टरीपर्यंत होता. स. गो. बर्वे यांच्या निवडणुकीत त्या भागात प्रचार जोरात असतांना आम्ही पाहिलाय. भिवंडीचे भाऊसाहेब धामणकर, शहापूर चे शांतारामभाऊ घोलप ठाण्याचे खासदार होते. पुणे जिल्ह्यातील रामचंद्र काशीनाथ उर्फ रामभाऊ म्हाळगी आणि कल्याणचे प्रा. रामभाऊ कापसे हे दोनवेळा ठाण्यातून खासदार झाले होते. काँग्रेस, जनता पक्ष, भाजप असे खासदार ठाण्याला लाभले होते. पण जेंव्हा परळ लालबाग येथून मोठ्या प्रमाणावर मराठी माणूस कल्याण डोंबिवली येथे स्थायिक झाला तेंव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिवसेनेने एकहाती आपल्या ताब्यात घेतली. माजी कामगार मंत्री साबिरभाई शेख यांनी छातीठोकपणे कल्याण डोंबिवली महापालिका शिवसेनाच जिंकणार असे बोलून दाखविले होते. याच आधारावर शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आणि कुशल संघटक धर्मवीर आनंद दिघे यांनी मोठ्या कौशल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या हातून खेचून घेण्यात यश मिळविले. भारतीय जनसंघ काय किंवा भारतीय जनता पक्ष काय हा पूर्वी भटाबामणांचा पक्ष म्हणून ओळखण्यात येत होता आणि कोकणस्थ ब्राह्मण जशा आवाजात (नाकातून) बोलतात तशा आवाजात आनंद दिघे बोलायचे. अतिशयोक्ती किंवा मजेचा भाग सोडून द्या पण कल्याण डोंबिवली चे संघनिष्ठ कसे बोलू शकतील तशा पद्धतीने बोलून या भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आनंद दिघे यांनी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातून शिवसेनेच्या ताब्यात घेतलेल्या या ठाणे मतदारसंघात प्रकाश परांजपे हे चारवेळा लोकसभेवर निवडून आले. भारत परीसिमन आयोगाने मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतर ठाणे आणि कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ झाले आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण डोंबिवली येथे मारझोड केल्यानंतरही मुंबईत शिवसेना भाजप चा पराभव होत असतांना कल्याण येथून शिवसेनेच्या आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंतराव डावखरे (विधानपरिषदेचे उपसभापती) यांचा पराभव करुन भगवा फडकविला होता. आता भारतीय जनता पक्षाचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव गणेश नाईक (नवी मुंबई चे माजी महापौर) हे ठाण्यात २००९ साली निवडून आले तर २०१४ साली माजी महापौर राजन विचारे यांच्या कडून पराभव पत्करावा लागला आणि पुन्हा ठाणे हा मतदार संघ शिवसेनेचा झाला. २०१९ साली सुद्धा राजन विचारे यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून पुनश्च एकदा ठाण्यातून संसदेत झेप घेतली. -योगेश वसंत त्रिवेदी, (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

error: Content is protected !!