ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून नुपूर शर्मा प्रकरण अधिवेशनात गाजणार


दिल्ली – आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे मात्र नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानावरून झालेल्या दोन हत्या आणि त्यानंतर निर्माण झालेला धार्मिक तणाव यामुळे विरोधक आज सरकारला धारेवर धरणार आहेत कारण नुपूर शर्माच्या अटकेची विरोधकांनी केलेली मागणी सरकारने फेटाळली होती त्याचे आज तीव्र पडसाद संसदेच्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे . त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार आहे दरम्यान या अधिवेशनात 24 नवी विधेयके मांडली जाणार आहेत पण अधिवेशन नीट चालले तरच त्यावर चर्चा होऊ शकेल
पावसाळी अधिवेशनाच्या पार्शवभूमीवर सरकारने आज विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर बैठक घेऊन अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली . तसेच अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी सहकार्याची अपेक्षा केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. या पावसाळी अधिवेशनात जी २४ विधेयके मंडळी जाणार आहेत त्यामध्ये वन संरक्षण विधेयक,ऊर्जा आरक्षण संशोधन विधेयक,कौटुंबिक न्याय संशोधन विधेयक या सारख्या प्रमुख विधेयकाचा समावेश आहे . आणि सरकारकडे जरी बहुमत असले तरी या सर्व विधेयकांवर चर्चा करूनच ती मंजूर करण्याची सरकारची भूमिका आहे. असे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. दरम्यान या पावसाळी अधिवेशनात संरक्षण दलाची अग्निपथ योजना ,नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानावरून देशात निर्माण झालेली तणावाची स्थिती आणि त्यातून उदयपूर आणि अमरावती मध्ये झालेल्या दोन हत्या यावरही अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. तसेच नेशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडी कडून सोनिया गांधींना पाठवण्यात आलेले समन्स आणि राहुल गांधींची ७ तास झालेली चौकशी यावरूनही अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे मात्र विरोधकांमध्ये एकजुटीचा अभाव असल्याने सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात त्यांना यश येईल. असे दिसत नाही त्यामुळे सरकारच्या विरोधात या अधिवेशनात विरोधकांचीच कसोटी लागणार आहे. .

error: Content is protected !!