ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ट्रम्प यांच्यावरील गोळीबारा नंतर भारतातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ


नवी दिल्ली/अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने यात ट्रम्प बचावले त्यांच्या कानाला गोळी लागून गेली त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांचे एन्काऊंटर केले परंतु ट्रम्प त्यांच्यावरील गोळीबारानंतर आता भारतातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे खास करून पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत खूप काळजी घेतली जात आहे कारण मोदी आणि अनेक हिंदुत्ववादी नेते दहशतवाद्यांच्या टारगेटवर असल्याची सुरुवातीपासून चर्चा आहे आणि याच पार्श्वभूमीवर या सर्व बड्या नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून अत्यंत काटेखोर सुरक्षा व्यवस्था उभारली जात आहे खास करून मोदींच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगली जात आहे मोदींच्या सार्वजनिक सभा सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी प्रचंड मोठा फौज फाटा तयार करण्यात येत आहे तसेच त्यांच्या सुरक्षेविषयीची माहिती कुठेही लिक होणार नाही याचीही सुरक्षा यंत्रणांकडून काळजी घेतली जात आहे कारण जो प्रकार अमेरिकेमध्ये घडला तसाच प्रकार भारतातही घडू शकतो अशी इथल्या सुरक्षा यंत्रणाला काळजी वाटते म्हणूनच सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे

error: Content is protected !!