ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शिक्षणाच्या आयचा घो!-बाल भारतीची नवी कोरी लाखो पुस्तके रद्दीत विकण्याचा निर्णय- शिक्षणमंत्री अंधारात?

मुंबई/शिक्षण हा भावी आयुष्याचा पाया आहे असे म्हटले जाते.आणि ते खरेच आहे.कारण शिक्षण घेतले तरच माणसाला पुढे नोकरी धंदा मिळतो आणि स्वतःच्या पायावर उभे राहता येते.सध्या कोरोंनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत .त्यामुळे बालभारतीने चक्क नवीन छापलेली अभ्यासक्रमाची लाखो पुस्तकेच रद्दीत काढण्याचा निर्णय घेला आहे त्यांच्या या निर्णयामुळे शैक्षणीक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे
पाठ्य पुस्तकात अनेक चुकांसाठी प्रसिद्ध असलेली बाल भारती ही राज्य सरकारची संस्था असून प्राथमिक ,माध्यमिक,आणि उच्च माध्यमिक पाठ्य पुस्तकांच्या निर्मितीची जबाबदारी या संस्थेकडे आहे त्यासाठी पाठ्य पुस्तकातील अभ्यासक्रमाचे सिलेक्षण करणारे एक तज्ञ साहित्यिकांचे संपादक मंडळ आहे .पुण्यात या संस्थेचे कार्यालय आहे.१९६७ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात मोठे योगदान आहे.दरम्यान कोरोणा मुळे गेल्या सव्वा वर्षापासून शाळा बंद आहेत त्यामुळे बालभारतीने विविध इयत्तांसाठी छापलेली जवळपास ४२६मेट्रिक टन पुस्तके संस्थेच्या ९ गोदामांमध्ये पडून आहेत ही सर्व पुस्तके नवी कोरी आहेत .पण कोरोंनामुळे त्यांचे वितरण होऊ शकले नाही .पण कोरोंना हा काही कायमचा राहणार नाही आणि आता तर कोरोंनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत असे असताना बालभारतीने लाखो नवीकोरी पुस्तके रद्दीत विकण्यासाठी चक्क टेंडर कडले आहे.त्यामुळे शक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे .गरीब मुलाना एकतर नवी पुस्तके विकत घेता येत नाही त्यामुळे काही मुले दुसऱ्याकडे जुनी पुस्तके घेऊन अभ्यास करतात अशी स्थिती असताना सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून छापलेली पुस्तके रद्दीत विकायला काढण्याचा हा प्रकार भयंकर असून तो त्वरित थांबवावा अशी मागणी पालक वर्गाने केली आहे.
बॉक्स/ शिक्षणमंत्री अंधारात?
कोरोंनाचा कारण पुढे करून नवी कोरी लाखो पुस्तके रद्दीत विकण्याच्या या प्रकाराची शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना काहीच माहिती नसल्याचे समजते मग हा निर्णय परस्पर कोणी आणि कसा घेतला ? ज्याने कुणी हा निर्णय घेतला त्याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे
.

error: Content is protected !!