ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हरयाणा व जम्मू काश्मीर मधील विधानसभा निवडणूक जाहीर

महाराष्ट्राची निवडणूक दिवाळीच्या नंतर होणार
नवी दिल्ली – निवडणूक आयोग राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर व हरयाणातील निवडणुकांची घोषणा केली . जम्मू काश्मीर मध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहेत तर हरयाणात १ ऑक्टोबरला निवडणूक आणि ४ ऑक्टोबरला निकाल आहे.
केंद्निरीय वडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “२०२४ च्या लोकसभा निवडणुका ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. ती यशस्वीपणे आणि शांततेने पार पडली. संपूर्ण लोकशाही जगासाठी एक अतिशय मजबूत लोकशाही पृष्ठभाग निर्माण केला, ती कोणत्याही प्रकाराशिवाय शांततापूर्ण होती. संपूर्ण देशाने निवडणुकीचा सण साजरा केला आणि जगात पहिल्यांदाच सर्वाधिक मतदान झाले
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या ९० झाली आहे. आता जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ जागा असतील. पी ओ के साठी फक्त 24 जागा राखीव आहेत. येथे निवडणूक होऊ शकत नाही. तर लडाखमध्ये विधानसभा नाही. अशा प्रकारे एकूण 114 जागा असून त्यापैकी 90 जागांवर निवडणूक होणार आहे. जम्मू प्रदेशात सांबा, कठुआ, राजौरी, किश्तवाड, डोडा आणि उधमपूरमध्ये प्रत्येकी एक जागा वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी काश्मीर भागातील कुपवाडा जिल्ह्यात एक जागा वाढवण्यात आली आहे.हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला मतदान होणार असून ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आह
जम्मू काश्मीर मध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान, २५ सप्टेंबरला दुसऱ्या तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे.
निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणतात की, हरियाणात दोन कोटींहून अधिक मतदार आहेत. ९० पैकी ७३ जागा सर्वसाधारण

error: Content is protected !!