सकल हिंदू समाजाच्या नाशिक बंदला- हिंसक वळण दगडफेक लाठीमार ३ पोलीसासह अनेक जखमी
नाशिक – बंगला देशातील हिंदुहीन्दुंवरील अत्याचाराच्या तीव्र प्रतिक्रिया आता भारतात आणि खास करून महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. आज सकाळ हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला हिंसक वळण लागून तोडफोड दगडफेक झाली यात ३ पोलिसांसह काही आंदोलक जखमी झाले दरम्यान शांतिगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ दुसरा समाजही रस्त्यावर उतरला त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तानावूर्ण आहे
सकल हिंदू समाजाच्यावतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला जुने नाशिक परिसरात हिंसक वळण लागले. यावेळी दगडफेक होऊन तीन पोलिस अधिकाऱ्यांसह युवक जखमी झाला. दुपारच्या सुमारास अचानक घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण होते. दंगलविरोधी पथकाने त्वरित हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बंगला देशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने सर्वपक्षीयांतर्फे नाशिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंद यशस्वी करण्यासाठी शहरातील हिंदू संघटनांकडून शहरील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेन रोड, सीबीएस, एमजी रोडसह उपनगरीय भागात दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी जुने नाशिक परिसरातील दूध बाजार, भद्रकाली पोलिस ठाणे परिसरात व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले
यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला. पिंपळचौक परिसरात एका कार्यकर्त्यास जमावाकडून मारहाण करण्यात आली. यामुळे दगडफेकीचा प्रकार घडला. पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले. जुने नाशकातील म्हसरूळ टेक, बडी दर्गा परिसरात दंगल नियंत्रण पथकाने कारवाई करीत जमावाला नियंत्रणात आणले.
परिस्अथिती आधिकच चिघळल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्याही फोडल्या. नागरिकांनी परिसरात थांबू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले होते. सायंकाळी पाचनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले.
दगडफेकीत गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त नितीन बच्छाव, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह इंदिरानगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेरमाळे हे जखमी झाले आहेत.