पालिकेच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा करणार्या दोषी अधिकार्यांवर थातुरमातुर करवाई
मुंबई – मुंबई महानगर पालिकेतील घोटाळेबाजणा पालिका प्रशासन कशा प्रकारे पाठीशी घालते याचे जीवंत उदाहरण म्हणजे स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत घोटाळा करणार्या अधिकारी कर्मचार्यांवर पालिकेने केलेली थातुर मातुर करवाई ! वास्तविक कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांचे साटे लोटे असताना निविदा प्रक्रीये पासून प्रत्यक्ष कामा पर्यन्त कंत्राटदार पालिका अधिकार्यांचे खिसे गरम करीत असतात .आणि हे तोडबाजीचे व्यवहार लाखोंच्या पटीत असतात त्यामुळे घोटाळा उघडकीस आल्यावर शिक्षाही तेवढीच कठोर व्हायला हवी परंतु पालिकेत चोर चोर मौसेरे भाई असा प्रकार असल्याने स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत दोषी आढळलेल्या कर्मचार्यांवर बाळा पुन्हा असे करू नको असे म्हणत एक नाजुक चपटी मारली आणि त्यांना सोडून दिले .अत्यंत नगणी अशी दंडात्मक कारवाई झाल्याने हे भ्र्ष्टाचार सही सलामत सुटले असे म्हणाला हरकत नाही . या घोटल्याची चौकशी करण्यासाठी पालिकेने उपायुक्त स्तरावरील त्रिदलीय समिति नेमली होती .दोन वर्षांनंतर या समितीचा अहवाल स्थायी समितीत मांडण्यात आला एकूण 83 जणांची चौकशी करण्यात आली त्यामध्ये 69 दोषी आढळले . 50 अभियंता कर्मचार्यांवर दंडात्मक करवाई करण्यात येणार आहे . उर्वरित 13 पैकी एकाचा मृत्यू झाला उर्वरित 12 जणांवर कारवाई काय तर कोणाचे एका महिन्यासाठी तर कोणाचे कायमस्वरूपी 1500 ते 3 हजार रुपये वेतनातून कापून घेतले जाणार .म्हणजे सेवाकालीन त्यांनी कंत्र दाराकडून लाखोंच्या पटीत पैसे कमावले .आणि त्यांची चोरी पकडल्यावर पालिका त्यांच्या वेतनातून कापणार किती तर 1500 ते तीन चार हजार याला कारवाई म्हणायची की भ्रष्टाचाराला प्रोत्साहन म्हणायचे तेच काळात नाही .घोटाळेबाजांवर जर अशा थातुर मातुर कारवाया व्हायला लागल्या तर पालिकेत आणखी लुटारू तयार होतील आणि मुंबईकरांच्या पैशाची लूटमार करतील अशी प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करीत आहेत .