ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांप्रदायिक हल्ले करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देवूनही हिंदू मंदिरांवर हल्ले सुरुच

ढाका:  बांग्लादेशातील मंदिरांवरील हल्ले सुरुच आहेत. तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा मंदिरांवर हल्ले झाले आहेत. बांग्लादेशच्या नौखाली जिल्ह्यात शुक्रवारी कथित समुदायानं इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. या घटनेची माहिती बांग्लादेशातील इस्कॉन समुदायानं ट्विट करुन दिली आहे. गुरुवारी बांग्लादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये काही समाजकंटकांनी हल्ला करत हिंदू मंदिरात तोडफोड केली होती यानंतर देशभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
200 जणांच्या जमावाचा हल्ला इस्कॉन समुदायाच्या ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात ट्विट करुन माहिती देण्यात आली असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावं, अशी मागणी करण्यात आली आहे. इस्कॉन समुदायानं बांग्लादेश सरकारकडे या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नौखालीतील इस्कॉन मंदिर आणि भक्तांवर समुदायानं हल्ला केला.
        बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांप्रदायिक हल्ले करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देत हिंदू समुदायाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही बांग्लादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले सुरुच आहेत. शेख हसीना यांनी हिंदू मंदिरांवर हल्ला करणाऱ्यांना पकडून कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या आश्वासनानंतर हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बांग्लादेशातील हिंदू मंदिरांच्या सुरक्षेसाठी देशभरातील मंदिरांच्या बाहेर अर्ध सैनिक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

22 जिल्ह्यात चांदपूर, बंदरबन, सिलहट, चटगांव, आणि गाजीपूर जिल्ह्यंचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे.

error: Content is protected !!