मुंबईकरांना महापालिकेचा मोठा दिलासा;एक डोस घेतलेल्यांना सुधा सवलत- मुंबईत कोरोणाची तिसरी लाट नाही
मुंबई- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण आणि कोरोणाचा पूर्वीच्या तुलनेत कमी झालेला प्रभावी यामुळे मुंबई सारख्या शहरात भलेही काही प्रमाणात रुग्ण वाढ झालेली असली तरी कोरोनची तिसरी लाट आलेली नाही असा खुलासा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. .तसेच आता एक डोस घेतलेल्यांना सुधा सर्व आस्थापनांमध्ये मुभा असेल आणि याबाबतचा निर्णय लवकरच टास्क फोर्स बरोबर चर्चा करून घेतला जाणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे .
मुंबईत जवळपास ७० टक्क्यांवर लोकांचे लसीकरण झालेले आहे. दोन ते अठरा वयोगटातील मुलांचेही लवकरच लसीकरण सुरू होणार आहे आणि मुख्य म्हणजे हळू हळू सर्व काही पूर्वपदावर येत आहे शाळा,मंदिरे,व्यापारी पेठा सुरू झालेल्या आहेत येत्या २२तारखेपासून नाट्य आणि सिनेमा गृह सुधा सुरू होणार आहेत त्यामुळे आता दिवाळी पूर्वीच एक डोस घेतलेल्यांना सुधा सर्व आस्थापनांमध्ये काम करण्याची तसेच रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा सरकार विचार करीत आहे याबाबत रुग्ण संख्या आणखी कमी झाली तर टास्क फोर्स च्या डॉक्टराशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले तर दुसरीकडे मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची कबुली मुंबई महानगर पालिकेने दिली आहे .मात्र तिसरी लाट आलेली नाही हे सुधा स्पष्ट केले आहे .तरीसुद्धा लोकांनी कोरोना बाबतचे नियम काटेकोरपणे पाळावे आणि मुंबई महाराष्ट्राला पूर्णपणे करोना मुक्त करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना साथ द्यावी असे राज्य सरकार आणि पालिकेने जनतेला आवाहन केले आहे .