ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

कर्जतमधे ७५ वर्षाचा व्रुद्धाची गोठ्यात झाली हत्या; खळबळ! कर्जत पोलिसांत गुन्हा नोंद; अप्पर पोलिस अधिक्षकांची भेट! कर्जत पोलिस घेतात आरोपींचा कसुन शोध!

कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील कर्जत पोलिस ठाणे हद्दीतील सावेळे येथे काल मध्यरात्री म्हैसीचा गोठ्यात एका ७५ वर्षीय व्रुद्धाची निर्घृण हत्या झाल्याने कर्जत तालुक्यांत प्रंचड खळबळ माजली आहे. या घटनेची नोंद कर्जत पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन काही संशयीतांना चौकशीसाठी ताब्यांत घेतले आसल्याची माहीती पोलिस सुत्रांकडुन मिळाली आहे.
या बाबत कर्जत पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, कर्जत तालुक्यांतील मौजे सावेळे येथिल आरिफ हजिमियॅा मुल्ला यांचे सावेळे येथे म्हसीचा गोठा आहे. काल रात्री १.३० वाजता या म्हैसीचा गोठ्यात रात्री १.३० वाजताचा दरम्यान आरिफ हजिमियॅा मुल्ला (वय ६५) आणि गणपत रामजी जाधव (वय ७५) दोघे रा. सावेले हे दोघे जेवण खावण करुन झोपले होते. त्याचवेळी रात्री १.३० वाजता या गोठ्यात अनोळखी ४ ईसम घुसले आणि त्यांनी फिर्यादी आरिफ यांचे अंगावरील, तोंडावरील गोधडी तोंडावर दाबून ठेवुन फिर्यादी यांचे हातपाय धरुन तोंड गोधडीने दाबुन फिर्यीदीचा पोटावर व पाठीवर हाताबुक्क्याने मारहाण करुन त्यांचा गळा दाबुन कोणीतरी अज्ञात ईसमाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी सोबत असणारे सावेळे बौद्धवाडी येथिल गणपत रामजी जाधव यांसदेखील या अज्ञात ईसमांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करुन कोणत्यातरी हत्याराने डोक्यावर व तोंडावर वार करुन जखमी करुन जीवे ठार मारल्याने कर्जत तालुक्यांत प्रंचड खळबळ माजली आहे. ही हत्या कोणी व का केली असावी याबाबत मात्र सारेच संभ्रमात सापडले आहेत.
या घटनेची फिर्याद जखमी आरिफ हाजिमियॅा मुल्ला यांनी कर्जत पोलिसात दिली असुन कर्जत पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद गुन्हा रजि नंबर २६५/२०२१ भादवि कलम ३०२, ३०७, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने मात्र कर्जत हादरले असुन पोलिसांनी काही संशयीतांची कसुन चौकशी सुरु केल्याने सांगणेत आले आहे.
दरम्यान या खुन प्रकरणी रायगड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्री. अशोक दुबे यांनी तपासाबाबत पोलिसांना सुचना केल्या असुन या घटनास्थळी रायगडचे अप्पर पोलिस अधिक्षक श्री, अतुल झेंडे यांनी भेट दिली आहे. या खुन प्रकरणाचा अधिक तपास कर्जकचा पोलिस निरीक्षक सौ. सुवर्णा पत्की ह्या रायगडचे पोलिस अधिक्षक अशोख दुधे, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, उपविेभागीय पोलिस अधिकारी श्री. संजय शुक्ला यांचा मार्गदर्शनाखाली करीत आहेत. यावेळी या घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा रायगड यांनी भेट दिली आसुन तपासाबाबत कर्जत पोलिसांना मार्गदर्शन करीत आहेत. कर्जत पोलिस या घटनेतील आरोपींचा कसुन शोध घेत आहेत. कर्जत पोलिस ठाण्याचा पोलिस निरीक्षक सौ. सुवर्णा पत्की यांनी लवकरच लवकर आरोपींचा मुसक्या आवळण्यात येतील असा विश्वास यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!