ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

पवारांचे आवाहन- राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र -अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध ?


मुंबई/ संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेली अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत .त्यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीस याना पत्र पाठवून तशी विनंती केली आहे तर शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध करा असे भाजपला आवाहन केले आहे.
रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक पुढील महिन्याच्या 3 तारखेला होणार आहे या निवडणुकीत दिवंगत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके याना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे तर भाजपने मुरजी पटेल यांना मैदानात उतरवले आहे या दोन मुख्य उमेदवारांसह काही अपक्ष सुधा मैदानात आहेत भाजप आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे .पण अचानक काल या निवडणुकीला राजकीय कलाटणी मिळाली कारण काल एकच दिवशी राज ठाकरे आणि शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करून ऋतुजा लटके याना बिनविरोध निवडून देण्याचे भाजपला आव्हान केले आहे .त्यासाठी राज ठाकरे यांनी थेट उप मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलेले आहे तर पवारांनी गोपीनाथ मुंडेंच्या वेळी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेतला होता याची भाजपला आठवण करून देत ऋतुजा लटके याना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!