ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

३० दिवसात हजर झाले नाही तर संपत्ती जप्त करणार- परमवीर सिंग फरार घोषित

मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून तपास यंत्रणांना वॉन्टेड असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना काल न्यायालयाने फरार घोषित केले.आता ३० दिवसांच्या आत जर ते हजार झाले नाहीत तर त्यांची मुंबई आणि चंदीगड येथील सर्व संपत्ती जप्त होणार आहे.
१०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तसेच ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळण्याचा परमवीर सिंग यांच्यावर आरोप आहे .या प्रकरणी मुंबई आणि ठाणे क्राईम ब्रांच त्यांचा शोध घेत आहे दरम्यान वेळोवेळी समन्स पाठवूनही न्यायालयाच्या एकाही सुनावणीस ते हजार राहिले नाहीत. त्यांच्या वतीने त्यांचा वकील येत असे अखेर न्यायालयाने तीन वेळा त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजावले, लुक आऊट नोटीस जारी केले तरी ते हजर झाले नाहीत त्यामुळे क्राईम ब्रांचने न्यायालयात अर्ज करून पुढील कारवाईसाठी परवानगी मागितली होती न्यायालयाने क्राईम ब्रांचा अर्ज मंजूर करून काल परमवीर सिंग यांना ३० दिवसात पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिलेत अन्यथा त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे.
परमवीर सिंग यांना न्यायालयाचा हा मोठा दणका आहे.त्यामुळे ते आता ३० दिवसांच्या आत हजर होतात की त्यांची संपत्ती जप्त होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

error: Content is protected !!