ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

कुंपणानेच शेत खाल्ले; परीक्षा परिषदेचा आयुक्तच निघाला सूत्रधार


सुपे गजाआड: पेपर फुटित १४ टोळ्या सक्रिय
पुणे : म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करता करता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि त्यांच्या सहाय्यक अभिषेक सावरीकरला यांना अटक केली आहे. सुपेच्या घरातून ८९ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ५० हजार ते एक लाख रुपये पेपर फोडण्यासाठी घेतले होते . ४ कोटी २० लाख रूपये जमा करुन सुपे आणि सावरीकरनं ते आपापसांत वाटून घेतले आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत पात्र केले. यात तुकाराम सुपे यांनी १.७० कोटी, प्रीतेश देशमुखनं १.२५ कोटी आणि अभिषेक सावरीकरनं दीड कोटी घेतल्याचं कबूल केलं आहे.त्यासाठी १४ टोळ्या सक्रिय असल्याची भयंकर माहिती उघडकीस आली आहे.
पुणे पोलिसांनी सुपे यांना काल चौकशीला बोलावल होत. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. पुणे सायबरच्या कार्यालयामध्ये ही चौकशीकरुन अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाटीईटी आणि शिष्यवृत्ती परीक्षांचं आयोजन केलं जातं. बीएड आणि डीएड झालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षक पात्रता परिक्षा घेतली जाते. विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेची जबाबदारी असलेल्या तुकाराम सुपे यांनाच अटक झाल्यानं टीईटी परीक्षेसंदर्भात कुंपणानंच शेत खालल्याचा संशय निर्माण झाला आहे. याप्रकरणी राज्याचा शिक्षण विभाग काय पावलं उचलणार हे पाहावं लागेल.

error: Content is protected !!