उपनगरचा राजा चा अनोखा उपक्रम ; बोरीवली रेल्वे स्थानकावर मोफत आरोग्य तपासणी ; असंख्य हमाल आणि बूट पॉलिश कर्मींनी घेतला लाभ
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते श्री विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील उपनगरचा राजा या एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आणि निवारा स्नेहसदन संस्थेच्या सहकार्याने बोरीवली रेल्वे स्थानकावर तीन क्रमांकाच्या फलाटावरील सभागृहात बूट पॉलिश करणारे आणि प्रवाशांच्या अंगावरील भार आपल्या खांद्यावर लीलया पेलणाऱ्या असंख्य हमाल बांधवांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला हमाल आणि बूट पॉलिश करणाऱ्या बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला उपविभाग संघटक सौ रेखा बोऱ्हाडे, वनवासी कल्याण आश्रमाच्या रेखाताई वाकणकर, उपनगरचा राजा चे सरचिटणीस मिलिंद कोळवणकर, रुपल भाटिया आणि सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमात डॉ. विनय पंडित, डॉ. परिसा केसरकर, डॉ. सोनल भिलारे, परिचारिका मेधा मुटाटकर यांनी या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली.