ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला नीतेश राणे वर अटकेची टांगती तलवार


मुंबई/ सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणात संतोष परब या शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता मात्र काल उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने नितेश राणे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असून ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा तयारीत आहेत असे समजते
गेल्या डिसेंबर मध्ये संतोष परब या शिवसैनिकांवर भर रस्त्यात हल्ला झाला होता या हल्ल्याच्या वेळी हल्लेखोरांनी नितेश राणे यांचे नाव घेतले होते अशी जबानी हल्ल्यातील जखमी संतोष परब यांनी दिल्यामुळे नितेश राणे यांच्यावर पोलिसांनी कलम ३०७,१२०,(b) आणी ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता त्यानंतर त्यांच्या अटकेच्या हालचाली सुरू झाल्यामुळे ते फरार झाले होते.त्यांच्या जामिनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला पण तीन दिवसांच्या सुनावणी नंतर सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जमिनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना अटक करू नये असे आदेश दिले होते त्यामुळे १५दिवसांनी नितेश राणे प्रकटले आणि त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकांच्या सत्कार संभरणभात भाग घेतला दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जमिणावरील सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता आणि काल न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून ते अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा तयारीत असल्याचे समजते

error: Content is protected !!