ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

नालेसफाईची ५६ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात- अधिकारी आणि कंत्राटदाराचा पालिकेच्या तिजोरीवर दरोडा

मुंबई – नालेसफाई म्हणजे निव्वळ हातसफाई हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे . नालेसफाईच्या कंत्राटदार कशा प्रकारे चुना लावतात यावर मुंबई जनसत्ताने अनेकवेळा प्रकाश झोत टाकला आहे. सध्या पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या डागडुजीसाठी काढल्या जाणाऱ्या ५६ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहेत हि उधळपट्टी कशासाठी असा सवाल आता मुंबईकर करीत आहेत.
पश्चिम उपनगरातील वांद्रे,खार, विलेपार्ले, सांताक्रूझ,अंधेरी, गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली दहिसर या भागात पडझड झालेल्या नाल्यांची डागडुजी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी अंधेरी पूर्वेकडील नॉर्थ अव्हेन्यू नाल्याच्या जीर्ण झालेल्या कल्व्हर्टचे नव्याने बांधकाम करण्यासाठी २ कोटी २७ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. तर सांताक्रूझ एच पश्चिम बांद्रा एच पश्चिम अंधेरी के पूर्व या प्रभागाच्या नाल्याची २४ कोटी ५१ लाख १७ हजार खर्च करण्यात येणार आहे, कांदिवली, बोरिवली येथील जीएं कार्व्हर्टचे बांधकाम करण्यासाठी १४ कोटी ९९ लाख हजारांचा खर्च आहे. मात्र हि एक प्रकारची उधळपट्टी आहे असा आरोप विरोधक आणि मुंबईकर करीत असल्याने ५६ कोटींच्या या निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण केवळ कंत्राटदारांचे खिसे भरून कमिशन लाटण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी हा खर्च काढला आहे असा आरोप मुंबईकर करीत आहेत .

error: Content is protected !!