ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मी परदेशात नाही तर भारतातच आहे .25 हजार कोटींच्या महा घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे प्रकटला

मुंबई – २५ हजार कोटींच्या महाआयटी घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे हा परदेशात पळून गेला असे महा आघाडीतील नेते सांगत होते. मात्र अमोल काळे याने आज त्यांच्यावरील सर्व आरोपी फेटाळले आहेत. आपण कुठेही पळून गेलेलो नाही, तर भारतातच आहोत असा खुलासा अमोल काळे याने केला आहे. तसेच या प्रकरणी आपली बदनामी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत असा इशाराहि त्यांनी दिला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत फडणवीस सरकारच्या काळात महाआयटी मध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता . तसेच या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अमोल काळे हा फडणवीस यांचा खास माणूस असून तो सध्या परदेशात पळून गेला आहे असा आरोप करण्यात आला होता त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते कॉंग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अमोल काळे याला भारतात आणण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत आणि त्याची चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून अमोल काळे याच्या नावाची चर्चा सुरु होती . अखेर आज अमोल काळे यांनी स्वताच प्रसार माध्यमांकडे एक पत्र देवून आपण कुठेही पळून गेलेलो नाही तर भारतातच आहे असा खुलासा केला.
अमोल काळे याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि महाराष्ट्र सरकारचे मी कोणतेही कंत्राट घेतलेले नाही. माझ्या खाजगी व्यवसायाची संपूर्ण माहिती माझ्या प्राप्तीकर विवरणात नमूद केलेली आहे. मी एक उद्योजक असून मुंबई क्रिकेट असोशियनचा मी उपाध्यक्ष आहे . त्यामुळे माझ्या संधर्भात होत असलेली वक्तव्य दिशाभूल करणारी आहेत. आणि अशी वक्तव्य करणाऱ्या विरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही अमोल काळे याने त्याच्या निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!