ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ऊस उत्पादकांना दिलासा! एफ आरपी एक रखमी देण्याचे न्यायालयाचे आदेश


मुंबई/राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला असून यापुढे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी एक रकमी द्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहे त्यामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ऊस उत्पादकांना टप्प्याटप्प्याने एफ आर पी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाविरुद्ध स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते तसेच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याची केवर सुनावणी होऊन न्यायालयाने तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय रद्दबातल ठरवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी द्या असे आदेश दिलेले आहे या आदेशामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

error: Content is protected !!