ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात राडा__ ५० हून अधिक दंगलखोरांना अटक


नागपूर/औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात जबरदस्त राडा झाला तोडफोड आणि जाळपोळ झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लाठीमार केला यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकी मध्ये काही पोलीस जखमी झाले आहेत दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेऊन सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत
औरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर हटवण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते .दरम्यान आज नागपूरच्या महाल परिसरात जीवाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते यावेळी दोन गट आमले सामने आले आणि जबरदस्त राडा झाला दोन्ही दोन्हीकडून दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली त्याचबरोबर आगी ही लावण्यात आल्या हे वातावरण चिघळण्यापूर्वीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सागर बंगल्यावर एक बैठक आयोजित करून या बैठकीत दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याची पोलिसांना आदेश दिले आहेत तसेच सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्याने नागपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे नागपूरमधील या प्रकरणी आत्तापर्यंत 50 हून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच पोलीस महाल परिसरातील गल्लोगल्ली फिरून कोंबिंग ऑपरेशन करीत आहेत नागपूरची ही दंगल इतर भागांमध्ये पसरू नये म्हणून पोलीस आवश्यक ती कारवाई करीत आहेत

error: Content is protected !!